दीपारती

जय देव जय देव जय पांडुरंगा ॥

दीपारती ओंवाळूं तुजला जिवलगा ॥ ध्रु० ॥

 

स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ॥

पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ती ॥

देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ॥

ओंवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ॥ जय० ॥ १ ॥

 

देवा तुज पाहतां येतो प्रेमपूर ॥

नाम निरंतर गातां होतों भव पार ॥

वाटे तव भक्ती ही मोठी प्रियकर ॥

विष्णुदासा देईं अखंड हा भर ॥ जय० ॥ २ ॥