कांकड आरती

भक्तीचीये पोटीं बोध-कांकडा ज्योती |

पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥ १ ॥

 

ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा |

दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ॥ धृ० ॥

 

काय महिमा वर्णूं आतां सांगणें तें किती |

कोटि ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ २ ॥

 

राही रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाही |

मयूरपिच्छचामरें ढाळिती ठगाईच्या ठाई || ३ ||

 

विटेसहित पाय म्हणुनि भावें ओंवाळूं |

कोटी रवि शशि दिव्य उगवले हेळूं ॥ ४ ॥

 

तुका म्हणे दीप घेउनी उन्मनींत शोभा ॥

विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ५ ॥