नैवेद्यारती

जय देव जय देव जय विठाबाई ॥

पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ॥ ध्रु० ॥

 

षड्रसपक्वान्नें हीं अर्पित तुज माईं ॥

कृपा करूनी तीं तूं मान्य करुनि घेईं ॥

तृप्ती सर्व जीवां जेवितां तुं आई ॥

जीवन सर्वांचें हें असे तव पायीं ॥ जय० ॥ १ ॥

 

आनंदें भोजन करावें आतां ॥

यथेच्छ जेउनी उच्छिष्ट उरतां ॥

तो प्रसाद देईं आपुल्या भक्तां ॥

हेंचि मागें ठेवुनि तव चरणीं माथा ॥ जय० ॥ २ ॥